भन्नाट आयडीया, उठाबश्या काढा मोफत तिकीटे मिळवा

शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (09:42 IST)
भारतीय रेल्वेने दिल्लीतल्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर एक मशीन बसवले आहे. त्या यंत्रामधून प्लॅटफॉर्मचे तिकीट विनामूल्य घेऊ शकता. मात्र  त्यासाठी या यंत्रासमोर उठाबश्या काढाव्या लागणार आहेत.
 
जे लोक १८० सेकंदात ३० वेळा उठाबश्या काढतील असेच लोक हे प्लॅटफॉर्म तिकिटासाठी पात्र ठरू शकतात. रेल्वेने फिटनेस राखण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. या यंत्राला ‘फिट इंडिया दंड बैठक मशीन’ असे नाव देण्यात आले आहे. या यंत्राचा व्हिडिओ रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि रेल्वे मंत्रालय यांनी ट्विट केला आहे. रेल्वेच्या या अनोख्या उपक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
यासाठी  मशीनसमोर काही अंतरावर उभे रहावे लागते. त्यानंतर १८० सेकंदात ३० वेळा उठाबश्या काढव्या लागतात. सुरूवात केल्यानंतर यंत्रामध्ये वेळ दर्शवला जातो. १८० सेकंद संपताच ३० उठाबश्या पूर्ण झाल्या तर एक प्लॅटफॉर्म तिकीट मिळते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती