Diwali Bank Holidays 2023: सलग 6 दिवस बँका बंद राहणार
शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (12:31 IST)
Bank Holidays in November 2023: भारतात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. दिवाळी, भाऊ बिज आणि छठ असे मोठे सण पुढील आठवड्यात येतील. 10 नोव्हेंबरपासून बँका सलग 6 दिवस बंद राहणार आहेत. दिवाळीसोबतच गोवर्धन पूजा, बली प्रतिपदा आणि भाऊ दूजच्या निमित्ताने देशातील अनेक शहरांमध्ये 10 ते 15 नोव्हेंबरपर्यंत बँका बंद राहणार आहेत. त्याचवेळी नोव्हेंबर महिन्यात एकूण 15 दिवस बँका बंद असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही बँकांशी संबंधित महत्त्वाचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण करायचे असेल, तर सुट्ट्यांची यादी नक्की पहा. असे होऊ शकते की ज्या दिवशी तुम्ही बँकेत जाण्याचा विचार करत आहात त्या दिवशी बँकेची सुट्टी असेल.
ही नोव्हेंबर 2023च्या सुट्ट्यांची यादी आहे
नोव्हेंबर 1- कन्नड राज्योत्सव/कुट/करवा चौथ: बेंगळुरू, इंफाळ आणि शिमला येथे बँका बंद राहतील.
5 नोव्हेंबर-रविवार सुट्टी
10 नोव्हेंबर- गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दीपावली/दिवाळी: शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
11 नोव्हेंबर - दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
12 नोव्हेंबर - रविवारची सुट्टी.
13 नोव्हेंबर- गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दीपावली/दिवाळी: आगरतळा, डेहराडून, गंगटोक, इंफाळ, जयपूर, कानपूर, लखनौ येथे बँका बंद राहतील.
14 नोव्हेंबर- दिवाळी (बळी प्रतिपदा)/विक्रम संवत नवीन वर्ष/लक्ष्मी पूजा: अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, गंगटोक, मुंबई, नागपूर येथील बँकांना सुट्टी असेल.
15 नोव्हेंबर- भाई दूज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मी पूजा/निंगल चक्कुबा/भ्रात्री द्वितीया: गंगटोक, इम्फाळ, कानपूर, कोलकाता, लखनौ आणि शिमला येथील बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही.
19 नोव्हेंबर- रविवारची सुट्टी.
20 नोव्हेंबर- पाटणा आणि रांचीमध्ये छठनिमित्त बँका बंद राहतील.
२३ नोव्हेंबर- सेंग कुट स्नेम/इगास बागवाल: डेहराडून आणि शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
25 नोव्हेंबर- चवथ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
26 नोव्हेंबर- रविवार
27 नोव्हेंबर- गुरु नानक जयंती/कार्तिक पौर्णिमा: अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, कोची, पणजी, पाटणा, त्रिवेंद्रम आणि शिलाँग वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
30 नोव्हेंबर- कनकदास जयंती: बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.
तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की नोव्हेंबरमध्ये देशभरातील बँका 15 दिवस बंद राहणार नाहीत. बँकेच्या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमध्ये होणाऱ्या इतर कार्यक्रमांवरही अवलंबून असतात. या सुट्ट्या राज्य आणि शहरांमध्ये बदलतात. तथापि, बँकेच्या शाखा बंद असल्या तरी, तुम्ही ऑनलाइन बँकिंगद्वारे तुमच्या घरच्या आरामात बँकिंगशी संबंधित अनेक कामे पूर्ण करू शकता.