पाच दिवस बँका बंद असल्यामुळे महत्वाची कामे उरकून घ्या

बुधवार, 10 मार्च 2021 (14:40 IST)
पुढील आठवड्यात बँकेची काम करताना अडचणींना सामना करावा लागणार असल्यामुळे काही महत्त्वाची कामे असतील तर लवकरात लवकर उरकून घ्या. कारण शुक्रवार (दि.१२) सोडून बँका पाच दिवसांसाठी बंद असणार आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात बँकेची कामे करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
 
उद्या (दि.11) महाशिवरात्रीनिमित्त राज्यातील बँकांना सुट्टी आहे. त्यानंतर शुक्रवारी बँका सुरू राहतील, पण नंतर 13 तारखेला दुसरा शनिवार आणि 14 तारखेला रविवार असल्याने बँका पुन्हा बंद असतील.
 
 बँकांच्या खासगीकरणाला विरोध करत बँक कर्मचारी संघटनेने संपाची घोषणा केली असल्यामुळे त्यानंतर १५ आणि १६ तारखेला म्हणजे सोमवार आणि मंगळवारीही बँका बंद असतील. नंतर 17 तारखेला बँका पुन्हा सुरू होतील. त्यामुळे जर बँकेची काही महत्वाची कामे असतील तर ती 11 मार्चआधीच संपवा, नाहीतर 11 मार्च ते 16 मार्च अशा सहा दिवसांमध्ये केवळ एकच दिवस कामकाज सुरु असल्याने बँकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती