Weibo हे अॅप ट्विटरप्रमाणे असल्याने २०१५ मध्ये चीनच्या भेटीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनच्या या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अकाउंट उघडले होते. Weibo च्या एका स्टार युझरपैकी मोदी एक होते. २००९ मध्ये चीनने हे अॅप सुरू केले होते. या अॅपचे 50 कोटींहून अधिक युझर आहेत. तर Baidu Search हे अॅप गुगलप्रमाणे काम करत असल्याने ते भारतात पाय रोवण्याचा प्रयत्न करत होते.
दरम्यान, भारत सरकारने चीनच्या २७५ अॅप्सची यादी तयार केली आहे. ही अॅप्स वापरकर्त्यांसाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी किती योग्य आहेत, याची चाचणी सध्या सुरू आहे. त्यानंतर ही अॅप्स बंद करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे.