गौतमपुरा येथील वैशिष्ट्यपूर्ण हिंगोट युद्ध

ShrutiWD
दिवाळ‍ीतील रोषणाई आणि फटक्यांच्या तडतडाटानंतर आता वेबदुनिया आपल्या वाचकांना पुन्हा एकदा याचा अनुभव देण्यास उत्सूक आहे. येथे रोषणाई आहे, फटाके आहेत, आणि त्याचा दणदणाटी आवाजही आहेत शिवाय दगडफेकही. पण त्याचबरोबर त्यात एक युद्धही आहे. होय, युद्ध. मध्य प्रदेशातील गौतमपुरा येथे हिंगोट युध्द खेळले जाते.

हिंगोट हा गौतमपुरा क्षेत्रात खेळला जाणारा पारंपरिक खेळ आहे. त्यालाच युध्दाचे स्वरूप दिले जाते. दरवर्षी या खेळात अनेक लोक जखमी होत असले तरी गावकर्‍यांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. या युध्दाच्या तयारीसाठी गावातील लोक एक ते दीड महिन्याआधीच हिंगोट नावाची फळे जमा करतात. नंतर या फळांमध्ये फटाक्यांची दारू भरतात.

या दारूने भरलेल्या देशी बॉम्बला एका बारीक दाड्यांला बांधून त्याला रॉकेटचे रूप दिले जाते. नंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण दिवाळीच्या दुसर्‍या दिवसाची वाट पहायला लागतात. या दिवसी हे युद्ध खेळले जातात. त्यालाच हिंगोट युध्द असे म्हणतात. हे युध्द कलंगा व तुर्रा या दोन समूहांमध्ये खेळले जाते.

या युध्दात दोन्ही गट अंदाधुंदपणे एकमेकांव
ShrutiWD
हिंगोट मारून फेकतात. प्रत्येक वर्षी या युद्धात चाळीस ते पन्नास लोक जखमी होतात. तरीही गावकर्‍यांचा उत्साह कमी झालेला नाही. गावाबाहेर शिकणारे, नोकरी करणारे आवर्जून या दिवसासाठी गावात येतात. या युध्दाची सुरवात कशी व केव्हा झाली याबद्दल नक्की कोणालाही माहित नाही. असे असतानाही सगळेजण हे युध्द खेळण्यासाठी खेळाच्या मैदानावर संध्याकाळी पाचपासूनच जमायला लागतात. युध्द सुरू होण्यापूर्वी गावाच्या मंदिरात पूजा केली जाते. नंतर युध्दाला सुरूवात होते. दोन्ही बाजूचे खेळाडू बचावासाठी ढाली घेऊन उभे राहतात. मग युध्दाला सुरूवात होते. हे युध्द सुरू झाल्यानंतर शेवटचे हिंगोट संपेस्तोवर सुरूच रहाते.

ShrutiWD
वीस वर्षांपासून हिंगोट खेळणारे कैलाश यांच्या मते हे युध्द ही गावाची परंपरा आहे. ते स्वत: हे युध्द खेळताना कितीदा तरी जखमी झाले. परंतु, तरीही हा खेळ खेळण्याचे सोडले नाही. राजेंद्रकुमार गेल्या एक महिन्यापासून हिंगोट जमा करण्याचे व त्यात दारू भरण्याचे काम करत आहेत. गेल्या वर्षी हिंगोट त्यांच्या चेहर्‍यावर लागला होता. त्यावर उपचार करताना त्यांना सात टाके घालावे लागले होते. तरीही त्यांनी हिंगोट खेळणे सोडले नाही.

हिगोंट खेळण्यासोबतच ते बनविणेही धोकादायक असते. फळांमध्ये दारू भरतानाही काही वेळा दुर्घटना होऊ शकते. त्यातच युध्द खेळायला सुरूवात करण्यापूर्वी योध्दे मनसोक्त दारू पितात.

त्यावेळी एखादी अनुचित घटना घडण्याच
ShrutiWD
शक्यताही असते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात केलेले असतात. हिंगोटच्या वेळी गावात उत्सवाचे वातावरण असते. एकमेकांविषयी प्रेम बाळगणारे लोक युद्ध सुरू झाले की मग मात्र एकमेकांचे वैरी झाल्यासारखे परस्परांवर हल्ला चढवितात. त्यात अनेक जण जखमी होतात. सर्वत्र जाळपोळीसारखे वातावरण असते. या हिंसक प्रथेविषयी तुम्हाला काय वाटते?

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा