टोनर क्लिंजिंग दरम्यान उघडलेले छिद्र बंद करतं. टोनिंगमुळे त्वचा टाइट होते. आपण घरी देखील टोनर तयार करू शकता. यासाठी एक लीटर पाण्यात तुळस, कडुलिंब आणि पुदिन्याची पाने उकळून घ्या. पाणी अर्ध होईपर्यंत उकळी घ्या नंतर स्टोअर करून घ्या.
त्वचा मॉइस्चराइज करणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक स्किन टाइपसाठी हे आवश्यक आहे. याने त्वचा नरम होण्यास मदतं होते. याने त्वचेला नमी मिळते. ऑयली स्किनसाठी जेल फॉर्मूला वापरावं, सामान्य त्वचेसाठी वॉटर-बेस्ड, तसेच ड्राय स्किनसाठी रिच, क्रिमी मॉइस्चराइजर वापरावं.