केसांसाठी फायदेशीर मुलतानी माती

मुलतानी माती केवळ सौंदर्यवर्धनासाठी वापरली जात नसून केसाचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठीही उपयुक्त ठरते.
रुक्ष केसांसाठी
रुक्ष केस मुलायम बनवण्यासाठी 3 ते 4 चमचे मुलतानी माती, अर्धा कप दही, दोन मोठे चमचे मध, चमचाभर लिंबाचा रस घालून केस आणि मुळांना लावा. अर्ध्या तासाने धुऊन टाका.
 
केस गळतीवर
चार चमचे माती, दोन चमचे दही, अर्धा चमचा मिरपूड घालून पॅक तयार करा आणि केसांना लावा. हा पॅक केस गळतीवर प्रभावी ठरेल.
 
फाटे फुटणे
केसांना फाटे फुटत असल्यास रात्री खोबरेल तेलाने मसाज करून गरम पाण्यात टॉवेल बुडवून तासभर केस बांधून ठेवा. नंतर मुलतानी मातीत दही मिसळून केसांना लावा. नंतर धुऊन टाका. दुसर्‍या दिवशी शेपू करा.
 
कोंडा
मुलतानी माती, मेथी दाणे पावडर, लिंबाचा रस एकत्र करून केसांना लावा. केस कापडाने बांधा. थोड्या वेळाने धुऊन टाका.

वेबदुनिया वर वाचा