चीकू
दिवसाला एक चीकू खाल्ल्याने आपल्याला ताजेतवाने जाणवेल. चीकूमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि ग्लुकोज सारख्या पोषक घटकांमुळे थकवा दूर होण्यास मदत होते. ग्लुकोजमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि व्हिटॅमिन्समुळे शरीराला विश्रांती मिळते.
पाईनअॅप्पल
अननसमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नीज आणि पोटॅशियम या सारखे पोषक घटक असतात. पाईनअॅप्पल खाल्ल्याने ताजेतवाने जाणवतं. शरीराला ऊर्जा मिळते. याचे सेवन केल्याने शरीरात ऑक्सिजन आणि रक्ताचा प्रवाह वाढतो ज्यामुळे चेहर्यावर तेज येते.