साप्ताहिक राशीफल 10 ते 16 एप्रिल 2016

मेष 
व्यवसायधंद्यात अंदाजावर पूर्णपणे विसंबून न राहता पर्यायी व्यवस्था करून ठेवणे चांगले. गरजेनुसार अनपेक्षित मार्गाने पैसे हातात पडल्यामुळे तुम्हाला उत्साह वाटेल. नोकरीमध्ये काही कामे हाताखालच्या व्यक्तींवर सोपवून केवळ महत्त्वाच्या गोष्टीतच लक्ष घाला. घरामध्ये अनुकूल घटना घडण्याची शक्यता आहे. खेळाडूंनी जय्यत तयारी करावी. विद्यार्थ्यांना करियरचे मार्गदर्शन घरातूनच मिळेल.

वृष

WD

घर आणि करियर या दोन्ही आघाडय़ांवर तुम्हाला बरीच मागणी राहील. व्यवसायधंद्यात अपेक्षेप्रमाणे काम मिळत राहील. नोकरीत वरिष्ठ एखादे अवघड काम मोठय़ा विश्वासाने तुमच्यावर सोपवतील. वरिष्ठांची मर्जी राखण्याकरिता असे काम तुम्ही कराल. घरातील कामाचा व्याप हळूहळू वाढेल. मुलांच्या प्रगतीकरिता तुम्ही सतर्क बनाल. लेखक, वृत्तपत्रकार चांगली कामगिरी बजावतील. खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल.

मिथुन

WD

रात्र थोडी सोंगे फार अशी तुमची स्थिती होणार आहे. व्यवसायधंद्यातील लांबलेल्या कामात पुढाकार घेऊन गती आणण्याचा प्रयत्न कराल. त्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्क आणि प्रवास करावा लागेल. आर्थिकमान समाधानकारक राहिल्याने काही कर्जे कमी करता येतील. घरामध्ये एखाद्या प्रश्नावर निष्कर्ष न निघाल्याने त्रास होईल. तरुण मंडळी आणि विद्यार्थ्यांना करियरच्या निमित्ताने घरापासून लांब जावे लागण्याची शक्यता आहे.

कर्क

WD

ज्या गोष्टी पूर्वी कठीण वाटल्या होत्या त्या पुढे सरकू लागल्यामुळे तुमचा उत्साह द्विगुणित होईल. नवीन आर्थिक वर्षांपासून व्यापारातील काही बेत लांबले असतील तर त्यांना आता वेग येईल. नोकरीत नेहमीपेक्षा वेगळे काम हाताळण्याची संधी आणि जादा अधिकार वरिष्ठ देतील. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरातील एखाद्या व्यक्तीचे प्रश्न मार्गी लागल्यामुळे वातावरण सुसह्य होईल.

सिंह

WD

तुमचे धोरण लवचिक ठेवलेत तर तुमचाच फायदा आहे. व्यापारउद्योगातील काही निर्णय तुमच्या कक्षेबाहेर असतील. त्यामुळे नको त्या व्यक्तींशी तुम्हाला तडजोड करावी लागेल. त्यांना भावनेच्या भरात भलतेच आश्वासन देऊ नका. घरामध्ये ज्या व्यक्तींची गरज आहे त्या व्यक्तीला अवश्य मदत करा. मानापमानाचा बाऊ करू नये. कलाकार, खेळाडू आणि राजकारणी व्यक्तींना अफवांमुळे प्रसिद्धी मिळेल.

कन्या

WD

परंतु कधीकधी या नियोजनाला फारसा अर्थ राहत नाही आणि मग सोयीस्कर मार्ग शोधून पुढे जावे लागते. व्यवसायधंद्यात अपेक्षित मार्गाने पैसे मिळण्यात विलंब होईल. हितचिंतक मदतीमुळे तुमची निकड भागू शकेल. नोकरीमध्ये पैशाकरिता तुमच्या तत्त्वांशी तडजोड कराल. तरुणमंडळींना नेहमीपेक्षा वेगळ्या वर्तुळात आणि वातावरणात राहण्याचा योग येईल. घरामध्ये वाढणारे खर्च ही बाब सोडल्यास बाकी परिस्थिती ठीक असेल. आवडीच्या छंदात मन रमवाल.

तू

WD

चार पैसे हातात असले की तुमच्या इच्छा आकांक्षांना धुमारे फुटतात. मात्र हातातील पैसे खर्च झाले की नंतर तुम्ही चिंता करीत बसता. व्यापारउद्योगात पूर्वी केलेल्या कामातून वसुली होईल. नोकरीमध्ये एखादी चांगली संधी दृष्टिक्षेपात येईल. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांनी तेथील परिस्थितीचा साकल्याने विचार करावा. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये खर्च वाढतील. विद्यार्थ्यांनी करियरचा निर्णय सावधतेने घ्यावा.

वृश्चि

WD

अशक्य वाटणाऱ्या ध्येयाचा पाठलाग कराल. कारखानदार व्यक्ती आधुनिक तंत्रांचा उत्पादन आणि फायद्याचे प्रमाण वाढविण्यासाठी करतील. व्यवसायधंद्यात प्रसिद्धी आणि इतर माध्यमांचा विक्री वाढवायला उपयोग होईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी उत्तेजित करेल. घरामध्ये शुभकार्याची नांदी होईल. तरुणांना मनपसंत व्यक्तीची जीवनसाथी म्हणून निवड करता येईल. राजकारणी व्यक्ती प्रसिद्धीझोतात राहतील.

धनू

WD

नवीन जागेची खरेदी किंवा जुन्या जागेची विक्री यासंबंधीचे काही प्रश्न असतील तर त्यामध्ये अचानक काही कारणाने नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायधंद्यातील परिस्थिती हळूहळू आटोक्यात यायला सुरुवात होईल. आर्थिक स्थिती जेमतेम असेल. नोकरीमध्ये तुमची एखादी मागणी वरिष्ठ मान्य करतील. जुन्या वादविवादावर पडदा पडेल.

मकर

WD

व्यवसायधंद्यात सभोवतालची परिस्थिती फारशी सुखावह नसेल. पण त्याकडे तटस्थपणे पाहत न राहता तुम्हीच थोडेफार धाडस करायचे ठरवाल. नोकरीमध्ये कामाचा तणाव आटोक्यात आल्यामुळे सुस्कारा टाकाल पण आळस करून चालणार नाही. घरामध्ये काही अडचणींमुळे लांबवावे लागलेले बेत फेरविचारात घेतले जातील. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. विद्यार्थ्यांना करियरची योग्य दिशा मिळेल. खेळाडू प्रसिद्धीझोतात राहतील.

कुंभ

WD

व्यवसायधंद्यात आर्थिक कारणामुळे तणाव वाढायला सुरुवात होईल. त्यामुळे काटकसर करून उत्पन्न कसे वाढवायचे याचाही विचार करावा लागेल. नोकरीमध्ये संस्थेच्या धोरणात बदल झाल्यामुळे काही सवलती हातातून निसटत आहेत असे वाटेल. मन शांत ठेवावे लागेल. घरामध्ये सबुरीचे धोरण ठेवा. प्रकृती सांभाळा. विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

मीन

WD

महत्त्वाच्या गोष्टीत तातडीने कृती करा. व्यापारउद्योगात प्रतिष्ठित व्यक्तींनी मदत करण्याचे आश्वासन दिले असेल तर या संधीचा फायदा उठवा. सरकारी कामे किंवा कोर्ट व्यवहारात तडजोड करून लांबलेल्या प्रश्नावर पडदा पडू शकेल. नोकरीमध्ये कामात सुधारणा करता येईल. घरामध्ये मुलांच्या प्रश्नात ठोस निर्णय घ्याल. कलाकार आणि खेळाडूंना नवीन संधी आकर्षित करतील.

वेबदुनिया वर वाचा