मिळालेल्या माहितीनुसार विजय राकडे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात सतत सक्रीय होता. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने त्याने बुधवारी टोकाचं पाऊल उचललं. खामगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच विजयने विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्याला तत्काळ फुलंब्री येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्रकृती आणखी खालवली.
विजयने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी सोडली होती. मराठा आरक्षणासाठी आपण आत्महत्या करत असल्याचे या चिठ्ठीत लिहिले होते. ही चिठ्ठी त्याचा खिशात आढळून आली आहे. या चिठ्ठीत विजयने लिहेले की, "माझ्या मुलींना, मुलांना शिकवण्यासाठी मीपूर्णपणे कटिबद्ध असतानाही माझ्या मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात त्यांच्यासाठी मी काही करू शकत नाही. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मी आत्महत्या करीत आहे."