इतर मोर्चांप्रमाणे हा मोर्चा कुठेच गेला नाही. मोर्चेकरांनी एकाच ठिकाणी बसून आपला निषेध मूकपणे नोंदवला. जिल्हाधिकाऱ्यांनीच आयोजनस्थळी येऊन आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं आहे. आयोजनस्थळी मोठा चिखल जमलेला असूनही महिलांनी शिस्तबद्धपणे याठिकाणी उपस्थिती लावली होती. दुपारी मोर्चाची सांगता झाली आहे.