बालिकेवर अत्याचारचा प्रयत्न मराठा समाज आक्रमक आंदोलन झाले हिंसक

सोमवार, 10 ऑक्टोबर 2016 (11:12 IST)
24 तासा नंतर जनजीवन होत आहे सुरलित 
नाशिक तळेगाव त्र्यंबकेश्वर येथील अल्पवयीन मुलीवर एका १५ वर्षीय मुलाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र रात्री उशिरा ही बातमी नाशिक मध्ये पसरली आणि सकाळ पासून अनेक ठिकाणी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून पोलीस गाड्यांवर दगडफेक तर अनेक ठिकाणी एस टी बस फोडण्यात आल्या आहेत. घोटी इगतपुरी रोडवर नागरिकांनी आंदोलन केले असून जमवाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा सुद्धा पोलिसांनी वापर केला आहे. तर नाशिकचे पालकमंत्री तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले असून ते स्वतः या बाबत लक्ष देत आहे. तर आता २४ तासा नंतर जनजीवन सुरळीत होत असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्थ ठेवण्यात आला आहे. मात्र खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
 
वैद्यकीय महिला डॉक्टर टीमने मुलीची तपासणी केली असून बलात्कार झाला नाही असा अहवाल दिला आहे अशी माहिती पालकमंत्री आणि पोलिसांनी दिली आहे.
 
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी  त्यांना नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागले तर आमदार सीमा हिरे यांच्या मोटारीवर चप्पल फेक करण्यात आली आणि नाशिक परीक्षेत्राचे डीआयजी विनय चौबे यांच्या मोटारीवर दगडफेक करण्यात आली.
 
घोटी , पाडळी फाटा, गोंदे, वाडीव-हे, ओझर, जत्रा हॉटेल परिसर, जानोरी फाटा, आडगाव जकात नाका परिसरात आज सकाळपासून आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून ठेवला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली होती. ५ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी दगडफेक झाल्या आहेत.
नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर 15 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. मात्र मेडिकल रिपोर्टनुसार बलात्कार झाला नसून, अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्टीकरण नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे.
 
तळेगावची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या प्रकरणात कुठलीही दिरंगाई होणार नाही, पारदर्शी तपास होईल, फास्ट ट्रॅकवर तपास करु, असं आश्वासनही महाजन यांनी दिलं. मुलीवर बलात्कार झालेला नाही, डॉक्टरांनी सांगितल्यानुसार अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला आहे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
 
दोषी मुलावर गुन्हा दाखल करावा आणि त्याला कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी नाशिकमध्ये रास्तारोको करण्यात आला. यामुळे काही वेळासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. या सर्व प्रकारामुळे रात्री नाशिकमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती, मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवत संतप्त जमावाला शांत केलं आहे.
 
: मुंबई-आग्रा हायवेवर एसटी बसची तोडफोड, ओझरजवळ बस फोडली
: मुंबई-आग्रा हायवेवर रास्तारोको, घोटीजवळ वाहतूक ठप्प
: घोटी, इगतपुरी बाजारपेठ बंद, नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ताही बंद
: जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार
: पोलिसांच्या तीन गाड्या जाळल्याची माहिती
: तर ऐकून २० बस गाड्या  जाळण्यात आल्या आहेत 
: नाशिक पुणे मुंबई शिर्डी आणि इतर ठिकाणी जात असलेल्या अनेक बस रद्द 
 
अफवांचा पूर
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समाजाच्या पदाधिकारी यांच्याशी बोलणे केल आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली आहे. तर मुलीवर जो प्रसंग ओढवला आहे त्याची गंभीर दखल सरकारने घेतली असून दोन दिवसात चार्जशिट दाखल करणार असून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम ही केस लढणार आहे. तर नाशिक मधील अनेक समाजकंटक चुकीचे मेसेज मोबाईलवर आणि सोशल साईटवर टाकत असून हे चुकीचे आहेत असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी  माहिती दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा