श्री मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांची 'ईएसआयसी'कडून आरोग्य तपासणी

शनिवार, 11 मार्च 2023 (17:41 IST)
अमळनेर (जिल्हा जळगाव महाराष्ट्र): येथील श्री मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांची महाराष्ट्र राज्य कामगार विकास सोसायटी, मुंबई व राज्य कामगार विकास महामंडळ, नवी दिल्ली अर्थात 'ईएसआयसी' यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ११ मार्च रोजी आरोग्य तपासणी करण्यात आली.
 
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित सेवेकऱ्यांना दैनंदिन जीवनात योगा, प्राणायाम यांचे सुदृढ आरोग्य राखण्यासाठीचे महत्त्व समजाविण्यात आले. तसेच तृणधान्याचे नियमित आहारातील महत्त्व देखील विशद करण्यात आले. यावेळी उपस्थित डॉक्टरांकडून सेवेकर्‍यांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन उपचारांसह अनेकांना औषधी देखील उपलब्ध करून देण्यात आली. 
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, सेवा दवाखाना अमळनेर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद वाघ, हेमंत सैंदाणे, आहारतज्ज्ञ डॉ. प्रांजल कदम, पतंजली योग पीठाच्या जळगाव जिल्हा प्रभारी ज्योती पाटील, परिचारक अजय मुन्तोडे, फार्मासिस्ट अमोल बाविस्कर, प्रमोद पाटील, भूषण पाटील यांच्यासह मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, कार्यालय अधीक्षक भरत पाटील, खरेदी व्यवस्थापक हेमंत गुजराथी  उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती