राष्ट्रपिता महात्मा गांधींनी काढलेल्या दांडी यात्रेला आज 81 वर्ष पूर्ण झाली आहेत. अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रेला प्रारंभ झाला होता. या निमित्ताने गेल्या मार्च महिन्यात अशाच प्रकाची प्रतिकात्मक दांडी यात्रेचे साबरमती आश्रमात करण्यात आले होते.
मीठ तयार करण्यावर ब्रिटीशांनी बंदी घातली होती, ही बंदी उठविण्यासाठी महात्मा गांधी यांनी 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला प्रारंभ केला होता. 25 दिवसांनंतर 241 कि.मी. अंतर पायी तुडवून 5 एप्रिलला दांडी पोहचले. 6 एप्रिल 1930ला मीठ तयार करून कायदा तोडला व भारताच्या संग्रामास खर्या अर्थाने प्रारंभ करून दिला.