विजय वडेट्टीवार येथे दिसलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याचा व्हिडीओ शेअर करत पर्यटनप्रेमींना निसर्ग वैभव असणाऱ्या ताडोबा अंधारी प्रकल्पाला भेट देण्याचं आवाहन केलं आहे. युवा वन्यजीव छायाचित्रकार अनुराग गावंडे यांनी हे दृश्य त्यांच्या कॅमेरामध्ये कैद केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की राज्यातील इतर पर्यटन प्रेमींनी सुद्धा पर्यटनासाठी ताडोबा ला पसंती देत सहकुटुंब मित्र परिवारासोबत भेट द्यावी.
हा व्हिडीओ शेअर करताना वडेट्टीवार असं म्हणाले आहेत की, 'निसर्गवैभव ताडोबा अभयारण्यात आढळलेल्या दुर्मीळ काळया बिबट्याच्या या व्हिडीओने पर्यटकांचे लक्ष ताडोबाकडे वेधले आहे. युवा वन्यजीव छायाचित्रकार अनुराग गावंडे यांनी हे दृश्य त्यांच्या कॅमेरामध्ये कैद केले आहे. राज्यातील इतर पर्यटन प्रेमींनी सुद्धा पर्यटनासाठी ताडोबा ला पसंती देत सहकुटुंब मित्र परिवारासोबत भेट द्यावी.'