महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गट सक्रिय, हा असणार प्लॅन

रविवार, 20 ऑक्टोबर 2024 (15:41 IST)
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अवघा महिना उरला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला पाठिंबा मिळवण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. भाजपचे वैचारिक सूत्र मानल्या जाणाऱ्या संघाने महाराष्ट्रातील सर्व संलग्न संघटनांशी समन्वय साधून पक्षाच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. 
 
संपूर्ण राज्यात भाजपच्याबाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गट (टीम) तयार केले आहेत. या प्रत्येक गटामध्ये 5-10 लोकांची एक टीम असते, जी लोकांच्या छोट्या गटांना भेटून त्यांना सरकारच्या धोरणांबद्दल सांगत असतात.

संघाचे हे गट आपापल्या भागातील परिसर आणि स्थानिक नेटवर्कद्वारे कुटुंबांपर्यंत पोहोचत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हे गट थेट भाजपसाठी मतांचे आवाहन करत नाहीत, तर राष्ट्रीय समस्या, हिंदुत्व, सुशासन, लोककल्याण आणि समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करून भाजप सरकारच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतील.

गट स्थापन करण्यापूर्वी आरएसएस आणि त्याच्याशी संलग्न संघटनांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या, ज्यामध्ये निवडणुकीची रणनीती तयार करण्यात आली.
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती