तसेच खरगे म्हणाले की, भारतात राजकीयदृष्ट्या सर्वात धोकादायक काही असेल तर ते भाजप आणि आरएसएस आहे. ते विषासारखे आहे, साप चावल्यास व्यक्तीचा मृत्यू होतो, अशा विषारी सापांना मारावे. भाजपवर ताशेरे ओढत काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, महाराष्ट्र निवडणुकीत प्रचार करणाऱ्या नेत्यांची संख्या त्यांच्या उमेदवारांपेक्षा जास्त आहे. ते पुढे म्हणाले की, येथे पंतप्रधान, गृहमंत्री आणि इतर नेते आले आहे. ते म्हणाले की आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील येथे होते. त्यांचे काय झाले माहीत नाही, उत्तर प्रदेशातील झाशी येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला. असे असतानाही त्यांची महाराष्ट्रातली सभा थांबली नाही.