रशियन साध्वी करणार जुना आखाड्यचे नेतृत्व

PR
एके काळी ज्या राशियात धर्मप्रसार अपराध मानला जात होता, त्या रशियात आता हिंदू धर्माचा चांगलाच प्रसार झाला आहे. अनेक हिंदू संप्रदायांचे तेथे अनुयायी मोठ्या संख्येने पाहालया मिळतात. रशियातील एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर ओल्गा अनेक वर्षांपूर्वी भारतात येऊन हिंदू साध्यी बनली. आता तिचे नाव स्वामी आनंदलिला गिरी, असे आहे. मौनी अमावस्येला होणार्‍या दुसर्‍या शाही स्नानावेळी ही रशियन साध्वी जुना आखाड्याचे नेतृत्व करणार आहे. या साध्वीने सांगितले, संन्यास धर्माचा स्वीकार केल्यानंतर आम्ही आमचा सन्मान मिळावा असल्याचेही तिने सांगितले. जगाच्या कानाकोपर्‍यात सनातन धर्माचा महिमा सांगण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे तिने म्हटले. या साध्वीप्रमाणेच अलाहाबादच्या कुंभमेळ्यात ‍विविध संप्रदायांचे अनेक परदेशी साधू सहभागी झाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा