सायकल ने जाऊन डिलिव्हरी करण्याऱ्या ,डिलिव्हरी बॉयची कहाणी झाली व्हायरल

बुधवार, 13 एप्रिल 2022 (17:33 IST)
पोट्यापाण्यासाठी लोक काहीही करतात.आपल्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह करण्यासाठी लोक कोणत्याही हंगामाची पर्वा न करता मेहनत करत असतात. आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी लोक जमेल ते करतात.कोरोनामुळे कित्येक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.लोक झोमॅटो आणि स्वीगी सारख्या कंपन्यांमध्ये काम करून लोकांनी दिलेलं ऑर्डर वेळीच पोहोचवतात. 
 
झोमॅटो आणि स्विगी सारख्या कंपन्यांचे काही डिलिव्हरी बॉय सायकलवरून लोकांच्या ऑर्डरची डिलिव्हरी करतात हेही पाहण्यात आले आहे. सध्या उष्णतेचा प्रकोप वाढतच आहे. त्यात सायकल वरून डिलिव्हरी करणे हे अवघड आहे. पण सध्या एका डिलिव्हरी बॉयचे फोटो  एका व्यक्तीने सोशल मीडियावर अपलोड केले आणि त्याची कथा शेअर केली. त्याची कहाणी वाचून लोकांनी त्याला क्राउड फंडिंग करून सायकल ऐवजी बाईक भेट म्हणून  दिली. 
 
ट्विटर यूजर आदित्य शर्माने सोमवारी झोमॅटोच्या डिलिव्हरी पार्टनर दुर्गा शंकर मीनाचा फोटो शेअर केला. तसंच 42 डिग्रीच्या उष्णतेमध्येही सायकलवरून डिलिव्हरी एजंटने वेळेवर कशी डिलिव्हरी केली हेही त्यांनी सांगितलं. आदित्य पुढे सांगितले की, दुर्गा मीना गेल्या 12 वर्षांपासून शिक्षिक होते , परंतु कोविड दरम्यान शाळेची नोकरी गेली.यानंतर त्यांनी झोमॅटोसाठी डिलिव्हरी सुरू केली. गेल्या चार महिन्यांपासून ते हेच काम करत असून एका महिन्यात 10 हजार रुपये कमावतात. 
 
 दुर्गा मीना यांनी बी.कॉम.चे शिक्षण घेतले असून पुढे त्यांना एम.कॉम करायचे आहे, परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना झोमॅटोसाठी काम करावे लागले आहे.
 
दुर्गा इंग्रजीत बोलत होते आणि त्यांना इंटरनेटबद्दल सर्व काही माहित असल्याचेही युजरने सांगितले. त्यांना आपल्या मुलांसाठी  लॅपटॉप आणि वाय-फाय घ्यायचे आहे जेणेकरून तो मुलांना ऑनलाइन शिकवू शकतील, कारण सर्व व्यवहार ऑनलाइन होत आहे. 
 
दुर्गाने युजरला सांगितले की त्याने काही कर्ज घेतले आहे आणि तो त्याच्या सध्याच्या कमाईने कर्जाची परतफेड करत आहे. त्यामुळे त्यांची बचत कमी झाली आहे .मला बाईक विकत घ्यायची आहे, कारण ते सध्या सायकलवर 10-12 डिलिव्हरी करू शकतात आणि त्याला श्वास घ्यायलाही वेळ नाही. 
 
दुर्गाने आदित्यला बाईक विकत घेण्यासाठी डाउन पेमेंट करण्याची विनंती केली. तो त्याचा ईएमआय स्वतः भरेल आणि 4 महिन्यांत व्याजासह डाउन पेमेंट परत करेल. यानंतर आदित्यने ट्विटरवर 75 हजार रुपये जमवण्याची मोहीम सुरू केली. यानंतर लोक दुर्गाला मदत करण्यासाठी पैसे देऊ लागले. लवकरच आवश्यक निधी जमा झाला आणि सायकलऐवजी मोटारसायकल घेण्याची त्यांची इच्छाही पूर्ण झाली. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती