महिलांवर अत्याचार झाला तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देशात अनेक संस्था कार्यरत आहेत, याशिवाय महिलांसाठी राष्ट्रीय आयोगही आहे. मात्र, तसा आयोग पुरुषांसाठी नाही. महिलांकडून होणाऱ्या छळामुळे पुरुषही आत्महत्या करताहेत. पुरुषांवर अनेक खोटे गुन्हे नोंदविले जात आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुषांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुरुष आयोग नेमण्यात यावा अशी मागणी राजभर यांनी केली आहे.
याबाबत अनेक पुरुषांनी या मुद्द्यासाठी पाठींबा दिला. जवळपास 5 हजारापेक्षा जास्त पुरूषांचे मला देशाच्या विविध भागांतून मेसेज आले, मेसेज करणाऱ्यांपैकी काहीजण तर परदेशातीलही असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.