सर्वांचा साथ + सर्वांगीण विकास + सर्वांचा विश्वास = विजयी भारत, पीएम मोदी यांनी केले ट्विट

गुरूवार, 23 मे 2019 (16:38 IST)
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत आलेल्या निकालात भाजपा नेतृत्वाखालील एनडीएला 300पेक्षा जास्त जागा मिळत आहे तसेच भाजप आपल्या स्वबळावर बहुतांशच्या जवळ आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक ट्विट केले आहे.  
पीएम मोदी यांनी लिहिले, सर्वांचा साथ + सर्वांचा विकास + सर्वांचा विश्वास = विजयी भारत. पीएम मोदी यांनी म्हटले की आम्ही सर्व सोबत पुढे वाढत आहो. आम्ही सोबतच समृद्ध होतो. आम्ही सर्व मिळून एक मजबूत आणि समावेशी भारताचे निर्माण करू. भारत परत विजयी होईल.  
 
या अगोदर अशी बातमी आली होती की भाजपने आज संसदीय बोर्डाची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 5.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्ष कार्यालयात भाजप   कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे. या दरम्यान असा ऍलन देखील झाला होता की 26 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार स्थापित करण्याचा दावा सादर करू शकतात. आज संध्याकाळी 6 वाजता पीएम मोदी देशाला संबोधित देखील करणार आहे.  
 
2014 निवडणुकीला लक्षात ठेवून नरेंद्र मोदी यांच्या सुनामी लाटांवर स्वार होऊन 2019चे महासंग्राम देखील भाजपने आपल्या नावावर केले आहे. जेव्हा की निकाल असे सांगत आहे की भाजप आपल्या सहकार्यांसोबत 300 पेक्षा जास्त जागा मिळवेल असे दिसून येत आहे. असे प्रथमच झाले, जेव्हा बहुमतासोबत दुसर्‍यांदा कोणता पक्ष सरकार बनवण्याच्या परिस्थितीत पोहोचला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती