ध्वजवज्रांकृश ब्रीदाचे तोडर ओवाळू || १ ||
नाभिकमल ज्याचे ब्रम्हयाचे स्थान |
हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन | ओवाळू || २ ||
मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी |
वेधले मानस हारपली दृष्टी | ओवाळू || ३ ||
जडित मुगुट ज्याचा देदिप्यमान |
तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन | ओवाळू || 4 ||
एका जनार्दनी देखियले रूप |
रूप पाहतां जाहले अवघे तद्रूप | ओवाळू || ५ ||