व्हॉट्‌सऍपवर रिअल टाईम लाईव्ह लोकेशन "ट्रॅक' करण्याची सुविधा

बुधवार, 1 फेब्रुवारी 2017 (17:34 IST)
आता व्हॉट्‌सऍपवर कॉन्टॅक्‍ट लिस्टमधील वापरकर्त्यांचे रिअल टाईम लाईव्ह लोकेशन "ट्रॅक' करण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी व्हॉट्‌सऍपचे हे नवे बिटा व्हर्जन ऍण्ड्रॉईड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमच्या स्मार्टफोनसाठी वापरता येणार आहे. ट्रॅकिंगचा पर्याय एक मिनिटापासून अमर्याद कालावधीसाठी असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, ग्रुपमध्येही ही सुविधा वापरता येणार आहे. लाईव्ह स्ट्रिमिंग बंद करण्याचा पर्यायही वापरकर्त्यांकडे असेल. व्हॉट्‌सऍप युजर्सना ही सुविधा ऍक्‍टिव्हेट करावी लागेल. 

वेबदुनिया वर वाचा