फेसबुकवर स्थानिक बातम्यांना प्राथमिकता मिळणार

बुधवार, 31 जानेवारी 2018 (16:14 IST)

फेसबुकने न्यूज फीड अपडेट केलंय. यामुळे आता फेसबुक युझर्सना स्थानिक बातम्या जास्तीत जास्त पाहायला मिळणार असून स्थानिक बातम्यांना प्राथमिकता मिळणार आहे.

फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही अपडेटची एक साखळी तयार केली आहे. त्यामुळे अधिक उच्च गुणवत्ता आणि अधिक विश्वासार्ह बातम्या दिसू शकतील. गेल्या वेळी आम्ही केलेल्या अपडेटमुळे आपल्या फ्रेडलिस्टमधल्या सर्वात जास्त विश्वासार्ह बातम्या युझर्सना दिसत होता. आज आम्ही जे अपडेट केलंय त्यामुळे 'स्थानिक बातम्या' अधिक असतील.  हा बदल सर्वप्रथम अमेरिकेत लागू करण्यात आलाय. या वर्षीच्या शेवटापर्यंत जगभर हा बदल लागू करण्याचा फेसबुकचा मानस आहे. 

यापूर्वी फेसबुक आपल्या न्यूज फीडला खाजगी आणि व्यावसायिक अशा दोन भागांत विभाजित करण्यासाठी टेस्टिंग करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती