नंबर पोर्टिग झाले सोपे आणि जलद

मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (09:01 IST)
आता नंबर पोर्टिग करण्याची प्रक्रिया सोप्पी आणि जलद झाली आहे. भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (trai)या नियमात बदल केले आहेत. आता मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. एका सर्कलमधील मोबाईल नंबर पोर्ट करायचा असल्यास दोन दिवसांत ही प्रकिया पूर्ण होणार. दोन वेगळ्या सर्कलमधील मोबाईल नंबर पोर्ट करायचे असतील तर यासाठी चार दिवसांचा वेळ लागणार असल्याची माहिती 'ट्रायने' दिली.
 
मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी कंपनीकडून दिरंगाई होत असेल तर, कंपनीला १० हजारांचा दंड द्यावा लागेल. एका सर्कलदरम्यान नंबर पोर्ट करण्यासाठी कमाल ४८ तासांची मर्यादा आहे. तर कॉर्पोरेट कनेक्शनसाठी ही मर्यादा ४ दिवसांची आहे. तसेच युनिक पोर्टिंग कोडची वैधता ही आधी १५ दिवसांची होती. आता ही मर्यादा कमी करुन ४ दिवस करण्यात आली आहे. हा नियम जम्मू-काश्मीर, आसाम आणि उत्तरेतील राज्यांसाठी लागू नसेल. या राज्यासांठी युनिक पोर्टिंग कोडची वैधता ३० दिवसांची आहे. ग्राहकाने पोर्टिंगसाठी पाठवलेली विनंतीदेखील रद्द करण्यासंदर्भातील नियम शिथिल करण्यात आले आहेत. एक टेक्स्ट मेसेजद्वारे पोर्टिंग विंनती रद्द करता येईल. कॉर्पोरेट कनेक्शन असलेल्या ग्राहकांना एका पत्राद्वारे ५० ऐवजी १०० विनंत्या रद्द करता येतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती