'केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका' ने कामकाज त्वरित बंद केले

केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनी आपले सारे कामकाज त्वरित बंद केल्याची घोषणा केली आहे. ही कंपनी  फेसबुक डेटा लिक प्रकरणात केंद्र स्थानी आहे. या कंपनीने अमेरिका आणि ब्रिटनमध्ये स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी निवेदन देण्याचीही घोषणा केली आहे. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीवर फेसबुकच्या कोट्यवधी लोकांचा व्यक्तीगत डेटा चोरी करून त्याचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. आम्ही आता व्यवसाय करू शकत नाही असे कंपनीने जाहीर केले आहे आणि त्वरित सगळे कामकाज बंद केले आहे. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका ही अमेरिकेतील एक मोठी अॅनॅलिसिस फर्म आहे. या कंपनीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काम केल्याने त्याची चर्चा झाली होती. 
 
केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीची कार्यालये न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लंडन, ब्राझिल आणि मलेशियामध्ये आहेत. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका ही मोठ्या प्रमाणावर डेटा पुरवणारी कंपनी आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती