सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड ने आपला १९९९ रुपयांचा वार्षिक प्लान अपडेट केला असून डेटा बेनिफट कमी केले आहे. BSNLच्या १९९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळत होता. परंतु, आता १ फेब्रुवारीपासून या प्लानमध्ये केवळ २ जीबी डेटा मिळू शकणार आहे.
BSNL चा १९९९ रुपयांचा वार्षिक प्लान
BSNL च्या या प्लानमध्ये आता ३ जीबी ऐवजी २ जीबी डेटा रोज मिळणार आहे. या प्लानची वैधता आधी इतकीच ३६५ दिवसांची राहणार आहे. प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, लोकल-एसटीडी कॉलची सुविधा मिळणार आहे. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे.