टोरेंट वेबसाइटवर गेल्यास 3 वर्षांची शिक्षा आणि 3 लाख रुपये दंड

मुंबई- अनेक पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातल्यानंतर आता सरकारने टोरेंट वेबसाइट्सवरही बंदी घालण्याचा विचार केला आहे. आतापर्यंत बंदी घातलेल्या वेबसाइटवर गेल्यास दंड द्यावा लागायचा पण आता शिक्षाही भोगावी लागणार आहे.
 
टोरेंट बेवसाईटवर गेल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. यात 3 वर्षांचा कारावास आणि तीन लाखांचा दंड भरावा लागू शकतो. टोरेंट फाइल्स बघितल्यास किंवा त्यावरून काहीही डाउनलोड केल्यास शिक्षा होऊ शकते.
 
बॅन असलेल्या वेबसाइट्सवर सूचना मिळते. त्यानंतरही साईटवर गेल्यास आपण अडचणीत सापडू शकता. ही सूचना अशी असते- 
 
"This URL has been blocked under the instructions of the Competent Government Authority or in compliance with the orders of a Court of competent jurisdiction. Viewing, downloading, exhibiting or duplicating an illicit copy of the contents under this URL is punishable as an offence under the laws of India, including but not limited to under Sections 63, 63-A, 65 and 65-A of the Copyright Act, 1957 which prescribe imprisonment for 3 years and also fine of upto Rs. 3,00,000/-. Any person aggrieved by any such blocking of this URL may contact at [email protected] who will, within 48 hours, provide you the details of relevant proceedings under which you can approach the relevant High Court or Authority for redressal of your grievance"
 
यात सूचित केले गेले आहे की सरकार किंवा न्यायालयाकडून मिळालेल्या निर्देशानुसार ही वेबसाइट बंद करण्यात आली असून यावर काहीही पाहणे, डाऊनलोड करणे, माहितीची कॉपी तयार करणे कायदेशीर गुन्हा आहे. याचे उल्लंघन केल्यास कॉपीराइट कायद्याअंतर्गत 3 वर्ष कारावास आणि 3 लाखांचा दंड होऊ शकतो.
 
ऑगस्ट २०१५ मध्ये सरकारने पॉर्न कंटेट असलेल्या ८५७ साईट्सवर बंदी घातली होती.

वेबदुनिया वर वाचा