पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी गुजरात टायटन्सला 7 धक्के दिले. संघातील हर्षल पटेलने सर्वाधिक ३ बळी घेत गुजरात टायटन्स संघाला अडचणीत आणले. त्याच्यासह लियाम लिव्हिंगस्टोनने 2, अर्शदीप सिंग आणि सॅम कुरनने प्रत्येकी 1 बळी घेत संघासाठी योगदान दिले.
गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत पंजाब किंग्जला 142 धावांत गुंडाळले. साई किशोरने संघासाठी चमकदार कामगिरी करत सर्वाधिक 4 बळी घेतले. मोहित शर्मा आणि नूर अहमद यांनीही प्रत्येकी 2 आणि राशिद खानने 1 बळी घेत संघासाठी योगदान दिले. गुजरात टायटन्सने हा सामना 3 गडी राखून जिंकला. संघाने अखेरच्या षटकात 7 गडी गमावून 146 धावा करत सामना जिंकला.