तालिबानने सलीमा मजारीला अटक केली, जाणून घ्या बंदूक घेऊन लढणारी ही शूर महिला कोण आहे ..

बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (15:01 IST)
काबुल :तालिबानने अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला राज्यपाल सलीमा मजारी यांना अटक केली आहे. बाल्ख प्रांताची राज्यपाल मजारी यांनी राष्ट्राध्यक्ष अब्दुल गनी यांच्याप्रमाणे तालिबानपुढे झुकल्या नाही. त्यांनी बंदूक उचलली आणि त्यांना अटक होईपर्यंत तालिबानी लढाऊंचा सामना केला.
 
वृत्तानुसार, तालिबानने महिला राज्यपाल आणि सरदार सलीमा मजारी यांना ताब्यात घेतले आहे. मजारी बाल्ख प्रांताची राज्यपाल आहे आणि तिने अगदी शेवटपर्यंत तालिबानी लढाऊंचा सामना केला. जेव्हा बाल्ख प्रांत तालिबान्यांनी ताब्यात घेतला तेव्हा या शूर महिलेला तेथील चाहर जिल्ह्यातून अटक करण्यात आली.
 
1980 मध्ये इराणमध्ये जन्मलेल्या सलीमा सोव्हिएत युद्धादरम्यान आपल्या कुटुंबासह अफगाणिस्तानात आल्या. त्यांनी तेहरान विद्यापीठातून शिक्षण घेतले, परंतु नंतर त्यांनी अफगाणिस्तानमध्ये राजकीय कारकीर्द केली.
 
2018 मध्ये, सलीमा मजारी यांना कळले की अफगाणिस्तानच्या बल्ख येथे राज्यपाल पद रिक्त आहे. त्यांनी अर्ज केला आणि नंतर त्या राज्यपाल म्हणून निवडून आल्या..
 
सलीमा मजारी च्या अटकेची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. या शूर महिलेच्या सुटकेसाठी जगभरातील लोक तालिबानला आवाहन करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती