या महिलेचे वय किमान 73 वर्षांचे असून पोटदुखीने त्रस्त होती. तिच्या पोटात अधूनमधून वेदना व्हायच्या. यावेळी तीव्र वेदना सुरू झाल्या म्हणून ती डॉक्टरांकडे गेली. तपासणीनंतर समोर आलं की हा स्टोन सात महिन्यांचा एक भ्रुण आहे. द सनच्या रिपोर्ट याआधीही या महिलेनं उपचार घेण्याचा प्रयत्न केला होता. पण डॉक्टरांना याबाबत माहिती मिळाली नाही. यावेळी जेव्हा पोटात दुखण्याचा त्रास उद्भवला तेव्हा या महिलेच्या पोटात गर्भ असल्याचं दिसून आलं.
४.५ किलो वजनाचं हे बाळ जवळपास ३५ वर्ष या महिलेच्या पोटात होतं. पण या भ्रुणामुळे कोणतंही नुकसान झालेलं नाही. कधीकधी किरकोळ वेदना जाणवत होत्या. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेव्हा शरीरात रक्ताची कमतरता जाणवते तेव्हा भ्रुण व्यवस्थित विकसित होत नाही. ज्यामुळे शरीराकडे भ्रुणाला बाहेर काढण्याचा कोणताही मार्ग नसतो. त्यानंतर हळूहळू भ्रुण दगडात बदलतो. म्हणूनच या महिलेच्या पोटात सापडलेल्या भ्रुणाला स्टोन बेबी असं म्हटलं आहे.