जन्माला येणाऱ्या बाळाच्या लिंगनिदानाला धरुन अनेक वैज्ञानिक, अवैज्ञानिक पद्धती, तंत्रमंत्र, उपचारांपासून अनेक श्रद्धा आणि अंधश्रद्धा प्रचलित आहेत. लिंग ठरण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी अनेक समाज-धर्मात विविध रूढीपरंपराही आहेत. मुलगा कसा होता आणि मुलगी कधी जन्माला येते, हे जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक धडपडत आहेत. आता वैज्ञानिकांनी ते ओळखण्याची एक सोपी पद्धत शोधली आहे. जन्माला येणारे बाळ मुलगा आहे की मुलगी हे आता थेट आईच्या रक्तदाबातून कळू शकणार आहे. अभ्यासकांच्या मते गर्भधारणेच्या आधी रक्तदाब कमी असलेल्या स्त्रि या मुलीला जन्म देण्याची शक्यता अधिक असते.