बेपत्ता 3 वर्षाच्या भारतीय मुलीच्या शोधासाठी अमेरिकेत ड्रोन्सचा वापर

गुरूवार, 19 ऑक्टोबर 2017 (09:49 IST)
तीन वर्षांच्या बेपत्ता भारतीय मुलीच्या शोधासाठी ड्रोन्सचा वापर करण्यात येत असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. शेरीन मॅथ्यूज ही तीन वर्षांची भारतीय मुलगी 7 ऑक्‍टोबरपासून बेपत्ता आहे. 7 ऑक्‍टोबर रोजी शेरीनच्या पालक पित्याने पहाटे तीन वाजता तिला शिक्षा म्हणून घराबाहेर काढले होते. दूध न पिण्याची शिक्षा म्हणून तिला घराबाहेर उभे केल्याची माहिती तिचे पालक वडील वेस्ली मॅथ्यूज यांनी दिली. मात्र त्यानंत्तर शेरीन परत दिसलेलीच नाही.
 
शेरीन अद्‌याप जिवंत असावी अशी आशा सार्जंट केवीन पर्लिच याने व्यक्‍त केली आहे. वेळ हा आपला मोठा वैरी असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. शेरीनच्या शोधकार्यामध्ये रिचर्डस्सन पोलीस विभागाला अजॉन्सन काऊंटी शेरीफचे अधिकारी आणि म्नॅन्सफील्डस्‌ पोलीस विभागाचीही मदत होत आहे. अनेक पातळ्यांवर हे शोधकार्य चालू आहे. शोधकार्यात कुत्रयांचाही वापर केला जात आहे.
 
काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असले, तरी त्याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे. मुलगी बेपत्ता झाली त्या दिवशी सकाळी मॅथ्यू कुटुंबाची एसयूव्ही गाडी एक तासासाठी बेपत्ता होती. त्याबाबत माहिती देण्यास पुढे येण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. मुलीच्या पालकांनी सत्य काय ते उघड करावे अशी मागणी एका धर्मगुरूने त्यांच्या घरासमोर एक फलक लावून केली आहे. मुलीचे पालक मातापिता या प्रकरणात सहकार्य करत नाहीत. वेल्सी मॅथ्यू यांना अटक केल्यानंतर पोलीसांनी त्यांची सख्खी सख्खी मुलगी ताब्यात घेतली आहे, ही मुलगी चार वर्षांची आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती