वॉशिंग्टन- भारतीय सैनिक आणि नागरिकांवर आणखी हल्ले झाले तर भारत शांत बसणार नाही, असा इशारा अमेरिकेतील एका सिनेटरने पाकिस्तानला दिला आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाचे गटनेते जो क्राऊली यांनी यासंदर्भात भाष्य केले. गेल्या काही महिन्यापासून पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या सुरू असलेल्या कारवायांमुळे सध्या भारत-पाकिस्तान सीमेवरील वातावरण प्रचंड तणावपूर्ण आहे.