पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 6.5 तीव्रता

रविवार, 26 फेब्रुवारी 2023 (10:40 IST)
गेल्या काही दिवसांपासून जगातील विविध देशांमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के बसण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुर्कीनंतर आता दक्षिण-पश्चिम पॅसिफिक भागात असलेल्या पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.5 इतकी होती. 
पापुआ न्यू गिनीच्या न्यू ब्रिटन भागात भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र न्यू ब्रिटनमध्ये 57 किलोमीटर खोल होते. 
 
भारतीय वेळेनुसार पहाटे 1.54 वाजता (7.24am AEDT) भूकंपाचे धक्के जाणवले. पापुआ न्यू गिनीच्या जवळ असलेल्या ऑस्ट्रेलियानेही या भूकंपाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्यानुसार भूकंपामुळे सुनामीचा धोका नाही. 
 
पापुआ न्यू गिनी भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो, कारण हा देश रिंग ऑफ फायरवर आहे.द रिंग ऑफ फायर हा जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश आहे. 
 
रविवारी सकाळी अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.3 होती. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील फैजाबादच्या पूर्व-ईशान्येस 273 किमी अंतरावर होता. त्याची खोली 180 किलोमीटरच्या खाली होती. 
 
Edited by - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती