जपानमध्ये 2 लाख 10 हजार कोंबड्यांना मारले

तोक्यो- जपानच्या उत्तरी होक्काईदो येथे अत्यंत संसर्गजन्य बर्ड फ्लूमुळे सुमारे 2 लाख 10 हजार कोंबड्यांना मारणे सुरू केले आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की या हिवाळ्यात कोंबड्यांना मारण्याची ही पाचवी कारवाई आहे.
 
संसर्गजन्य एच-5 च्या प्रसारावर प्रतिबंधासाठी शेकडो अधिकारी कार्यरत आहे. जपानच्या अनेक पोल्ट्री फर्म्समध्ये ही फ्लू आढळले आहे.
 
काही आठवड्यापूर्वी संक्रमणामुळे येथील शहर नीगातामध्ये 5,50,000  कोंबड्या आणि होक्काईदोच्या दक्षिणमध्ये ओमोरी प्रीफेक्चरमध्ये 23,000 बदक मारले गेले होते. प्रशासनाने संक्रमित फर्म्सच्या जवळीक क्षेत्रात कोंबड्या आणि त्याचे उत्पादांवर बंदी घातली आहे आणि येथील रस्तेही बंद केले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा