भारताकडून पाकला कोणताही धोका नाही : अमेरिका

बुधवार, 17 जानेवारी 2018 (12:17 IST)
अमेरिकेने पाकिस्तानला भारताकडून कोणताही धोका नसल्याचे आश्वासन दिले आहे. पाकिस्तानचे संरक्षणंत्री खुर्रम दस्तगीर खान असे म्हणाले आहेत. 
 
पाकिस्तानने भारताबाबतच्या स्वतःच्या रणनीतीत सकारात्मक बदल करायला हवा, असेही अमेरिकेचे मत आहे. पाकिस्तानने अमेरिकेशी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असे विधान खुर्रम दस्तगीर खान यांनी केले आहे. कठोर भूमिका सोडून टेबलावर सर्व प्रकरणे ठेवून ती सामोपचाराने सोडवण्याची गरज आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिकेमधील गैरसमज दूर होतील, असेही खुर्रम दस्तगीर खान यांनी स्पष्ट केले आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे, यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकने पाकिस्तानला दणका दिला होता. पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानला पुरवण्यात येणारी सुरक्षा मदत थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नोर्ट यांनी दिली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती