अल्लेप्पो शहरावर लष्कराने पूर्णपणे नियंत्रण मिळवले

पूर्ण जगात आतंकवादी हल्ले आणि गृह युद्धाने बेचिराख झालेल्या सिरीयाला अखेर थोडी आशा निर्माण झाली आहे. सीरियातीलले सर्वात मोठे आणि मुख्य अल्लेप्पो शहरावर लष्कराने पूर्णपणे नियंत्रण मिळवला आहे. वर्ष २०११ मध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धातील आतापर्यंतचे लष्कराचे हे सर्वाधिक मोठे यश आहे. 
 
शहराला बंडखोरांपासून पूर्णपणे मुक्त करण्यात आल्यानंतर सीरियाच्या लष्कराकडून ही घोषणा करण्यात आली आहे. या गृह युद्धात जवळपास ४ लाख लोक मृत्यू मुखी झाले तर अनेक हा देश सोडून समुद्रमार्गे पळून गेले आहेत. त्यामुळे हा विजय मोठा असून त्यामुळे आता सैनिक पूर्ण सिरीयावर लक्ष केंद्रित करू शकणार आहे.

वेबदुनिया वर वाचा