सार्क'चा विस्तार! पाकिस्तानची खेळी

इस्लामाबाद- ‘सार्क’ वरील भारताचा वाढता प्रभाव रोखणसाठी पाकिस्तान विस्तार करणची शक्यता अजमावणची नवी खेळी केल्याचे ‘डॉन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.
 
सार्कमध्ये चीन व इराणचा समावेश करण्यासाठी पाक प्रयत्न करीत असल्याचे राजकीय निरीक्षकांनी म्हटले आहे. पाकिस्तानातील संसद सदस्यांचे शिष्टमंडळ सध्या न्यूयॉर्क येथे असून या शिष्टमंडळाने गेल्या आठवडय़ात वॉशिंग्टन भेटीत सार्क विस्तराचा मुद्दा मांडला होता.
 
ग्रेटर साऊथ आशिया लवकरच प्रभावीपणे कार्यरत होईल, असे मत पाकचे खासदार मुशाहीद हुसेन सय्यद यांनी एका वार्तालपात बोलताना स्पष्ट केले होते. चीन- पाकिस्तानमधील आर्थिक कॉरिडॉर म्हणजे दक्षिण व मध्य आशियाला जोडणारा आर्थिक मार्ग असल्याचे मुशाहिद यांनी स्पष्ट केले आहे. ग्वादर बंदरामुळे केवळ चीनचा नव्हे तर मध्य आशियातील अनेक देशांना लाभ होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा