स्मार्टफोनमुळे लोकांना वेड लागल्याचे तर आपण बघतंच आहोत पण अमेरिकेतील लास वेगासमध्ये एका व्यक्तीने चक्क स्मार्टफोनशी लग्न केलं आहे. लग्न करून त्याने आविष्यभर प्रेम निभवण्याचे वचनही दिले.
एरॉन चेर्वेनाक आर्ट डायरेक्टर आहे. लग्नासाठी 365 किमी दूर येऊन त्याने सोहळा पार पाडला. लग्नासाठी त्याने स्वत:ने खास नवर्यामुलाचा ड्रेस घालून नवरी अर्थात स्मार्टफोनला कव्हरमध्ये ठेवलेले होते.
लिटील वेगास चॅपलच्या पादरीनं लग्नाच्या विधी पार पाडल्या. नंतर तरुणाने स्मार्टफोनला कायद्यानं आपली पत्नी मानले आणि तिच्यावर प्रेम करण्याचे, तिचं लक्ष देण्याचे आणि तिच्याप्रती इमानदार राहण्याचे वचन दिले.