साहनी यांना अबू सबाह या नावानेही ओळखलं जातं. एका प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपनीचे साहनी हे मालक आहेत. साहनींच्या कंपनीचा यूएई, कुवैत, भारत आणि अमेरिका या देशांमध्ये विस्तार आहे. आवडता नंबर खरेदी करण्याची आवड असल्यामुळे ही बोली लावली, असं साहनी यांनी सांगितलं आहे. साहनींनी 9 नंबर घेण्यासाठी 25 मिलियन दिरहम एवढी बोली लावली होती. आपल्याकडे आतापर्यंत अशा 10 यूनिक नंबर प्लेट जमल्या आहेत. या सर्व पाट्या ते वापरणार आहेत.