स्कार्लेट जॉन्सन गुलाबजामच्या प्रेमात

शनिवार, 7 जून 2014 (11:12 IST)
‘द अव्हेंजर्स’, ‘कॅप्टन अमेरिका’, ‘हिचकॉक’, ‘आयर्न मॅन 2’ सारख्या हॉलिवूडपटांमधून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सन सध्या गुलाबजामच्या जाम प्रेमात आहे. तिला हा अस्सल भारतीय गोड पदार्थ इतका आवडला आहे की, भेटेल त्याच्याकडे ती गुलाबजामची तोंडभरून स्तुती करते आहे!

त्याचे असे झाले की, ‘आयर्न मॅन’चा दिग्दर्शक जॉन फेरावू सध्या ‘शेम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. या चित्रपटात स्कार्लेट भूमिका हॉटेल मनेजरच्या भूमिकेत आहे. ‘शेम’च्या चित्रिकरणादरम्यान वेगवेगळ्या पाककृती सेटवर बनवण्यात आल्या होत्या. त्यात भारतीय खाद्यपदार्थाचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

अर्थातच भूमिकेच्या मागणीनुसार स्कार्लेटला या प्रत्येक पदार्थाची चव चाखायला मिळाली. आणि आश्चर्य म्हणजे ती गुलाबजामच्या प्रेमातच पडली. आयुष्यात प्रथमच एवढा गोड आणि सुंदर पदार्थ चाखायला मिळाला असल्याचे सांगत स्कार्लेटने सेटवरचे सगळेच गुलाबजाम फस्त केले.

अर्थात सेटवर उपस्थित असलेल्या इतरांनाही तिने थोडाथोडा गुलाबजाम चाखायला दिला. मात्र, तिचे गुलाबजामप्रेम एवढ्यावरच थांबले नाही तर गुलाबजामची महती ती प्रत्येकाला सांगत सुटली आहे.

वेबदुनिया वर वाचा