ली सेडॉक्सचे सौंदर्य बघून सर्वजण झाले थक्क

WD
28 वर्षीय फ्रेंच ब्यूटी ली सेडॉक्सने काही दिवसांपासून तिच्या सौंदर्यामुळे जरा जास्तच चर्चेत आहे. ब्रिटिश अकादमी फिल्म अँवॉर्डस् सोहळ्यात तिचे सौंदर्य बघण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. रात्री लीने जेव्हा लंडनच्या दा रॉयल ओपेरा हाऊस सोहळ्याच्या रेड कार्पेटवर पाय ठेवला तेव्हा तिला सर्वजण बघतच राहिले. मागील आठवडय़ात बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्येही तिने तिच्या ‘ला बेले एफ ला बेफे’ या सिनेमाचे प्रमोशन लाल रंगाचा ड्रेस परिधान करून केले. त्यावेळीही लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. 28 वर्षीय ली सेडॉक्सचा जन्म पॅरिसमध्ये झाला असून ती एक फ्रेंच अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने फ्रांन्सीस सिनेमांसाठी आणि टीव्ही शोसाठी अनेक अँवॉर्ड जिंकले आहेत.

वेबदुनिया वर वाचा