मालिआ ओबामा पोहोचली हॉलिवूड

बुधवार, 18 जून 2014 (17:41 IST)
हॉलिवूडच्या एका चित्रपटात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाची मुलगी मालिया ओबामा प्रॉडक्शन असिस्टेंटम्हणून काम करत आहे. मालिया ओबामा 4 जुलै रोजी 16 वर्षांची होणार असून, तिने हॉलिवूड ऐक्ट्रेस हेले बेरीची साय-फाय सिरींजच्या येणार्‍या चित्रपटाशी स्वतः:ला जोडले आहे. या चित्रपटात काम करत असून मालिया इतर सर्व वर्कर्ससोबत बिलकुल साधारण व्यवहार करत आहे, ज्याने कुणाला ही असं वाटायला नको की ती अमेरिकेच्या राष्ट्रपतींची मुलगी आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार बराक ओबामा यांची बायको, फर्स्ट लेडी मिशेल ओबामाने मालियाची सीबीएस स्टुडियोशी भेट घातली होती, ज्याने ती या सिरींजमध्ये काम करू शकते. मालियानेसांगितले की ती या चित्रपटात पायलटच्या शूटसाठी काम करीत आहे, ज्यात ती प्रॉडक्शन डिपार्टमेंटमध्ये  कॉम्प्युटर अलाइमेंट म्हणून लागली आहे. याचसोबत टेक घेण्याअगोदर डायरेक्टरमालियाला प्रॉडक्शन स्लेटला यूज करण्याचा मोका देतात. प्रॉडक्शन स्लेट म्हणजे, ज्याला शूटिंग दरम्यान शूट सुरू करणे आणि कट करण्यासाठी प्रयोगात आणले जाते. 
 
मालियाने हसतं म्हटले की तिला असा मोका प्रथमच मिळाला आहे आणि तिच्यासाठी हे काम करणे मोठे आव्हान आहे, पण या कामाला ती पूर्ण मेहनत घेऊन यशस्वीरीत्या पाड पाडणार आहे. चित्रपटात हॉलिवूड ऐक्ट्रेस हेले बेरी ऐस्ट्रोनॉटची भूमिका करत आहे, जी बर्‍याच वर्षांनंतर स्पेसमधून एक मिशन पूर्ण करून परतते. त्यानंतर आपल्या पती व मुलासोबत आपल्या रिलेशनशिपला सुधारण्याचा प्रयत्न करीत असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मिशेल आणि मालियाने नुकतेच कॅलीफोर्नियेत चार दिवसाचा टूर काढला होता.

वेबदुनिया वर वाचा