मर्लिन मन्रोच्या दुर्मीळ छायाचित्राचा लिलाव

PR
जगप्रसिद्ध अभिनेत्री आणि हॉलिवूड सुपरस्टार मर्लिन मन्रो हिच्या दुर्मीळ छायाचित्राचा लिलाव करण्यात येणार आहे. हे छायाचित्र त्यांच्या शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतरच्या काळातील आहे. ग्रेट मँचेस्टर येथ ठेवण्यात आलेल्या या छायाचित्राला लिलावात 1,500 पौंड म्हणजे जवळजवळ एक लाख 35 हजार रुपये एवढी किंमत मिळण्याची शकयता आहे.

हे छायाचित्र काढण्यात आले, त्यावेळी तिचे वय 15 वर्षे होते. त्यावेळी ती 'नोरना जीन बेकर' या नावाने ओळखली जात होती. ओमेगा ऑक्शन या कंपनीतर्फे 84 इंच लांब- रुंद असलेल्या या छायाचित्राचा स्टॉकपोर्टमध्ये शुक्रवारी लिलाव करण्यात येणार आहे. त्यात युवराज चार्ल्स आणि युवराज्ञी डायना यांनी नाताळच्या निमित्ताने पाठविलेल्या भेटकार्डचाही समावेश असणार आहे.

वेबदुनिया वर वाचा