हॉलिवूड सुपरस्टार रिचर्ड गेर अफेअरमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रिचर्ड गेर काही दिवसांपासून भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक सलमान रश्दी यांच्या माजी पत्नी आणि मॉडेल पद्मा लक्ष्मीसह डेटिंग करत असल्याची सर्वत्र चर्चा आहे. पद्मा लक्ष्मी ‘बूम’ या बॉलिवूड सिनेमातून समोर आली होती. तसेच, रिचर्ड यांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला किस सार्वजनिक ठिकाणी करून सर्वत्र खळबळ उडवली होती. पद्मा लक्ष्मी आणि रिचर्ड यांनी मीडिया आणि सार्वजनिक ठिकाणी
एकमेकांपासून दूरावा ठेवला. त्यांनी आपल्या नात्याविषयी नेहमी मौन बाळगले. मात्र न्यू जर्सीच्या एका रेस्तरॉमध्ये दोघांना एकत्र बघितल्या गेले. 64 वर्षीय रिचर्ड गेर आणि 43 वर्षीय पद्मा लक्ष्मी दिर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार, रेस्तरॉमध्ये दोघे प्रेमीयुगलाप्रमाणे वावरत होते. पद्मा लक्ष्मी यांनी रिचर्ड यांना डिझाइन टीप्स देत होती.
यापूर्वी रिचर्ड यांनी हॉलिवूड अभिनेत्री कॅरी लोव्हेलशी लग्न केले होते. जेम्स बाँडची हिरोइन राहिलेली कॅरी लोव्हेल आणि रिचर्ड यांना एक 14 वर्षाचा मुलगा आहे. दोघे 2013 मध्ये एकमेकांपासून विभक्त झालेत. मात्र, त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतलेला नाही. तसेच पद्मा लक्ष्मीसुध्दा सलमान रश्दी यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर उद्योगपती फोस्टमॅनसह डेटिंग करत होती. पण फोस्टमॅनचा 2011 मध्ये कर्करोगामुळे निधन झाले. लक्ष्मी आणि सलमान रश्दी यांचा 2007 मध्ये घटस्फोट झाला. 1999 मध्ये पद्मा लक्ष्मी ह्या रश्दी यांना एका पार्टीत भेटली होती. दोघांनी 2004 मध्ये लग्न केले होते. सलमान रश्दी पद्मापेक्षा 23 वर्षानी मोठे होते.