बेला हदीदने नुकतेच एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूट दरम्यानच तिने एका फोटोसाठी विवस्त्र पोझ दिली. यावेळी मॅगझिनच्या प्रोडक्शन टीममधल्या एकाला बेलने तिचा मोबाइल दिला आणि तिचा शूटवेळचा फोटो काढण्यास सांगितले. हाच फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र या फोटोच्या कॅप्शनमध्ये बेलाने आपल्या आईची माफी मागत ‘आई मला माफ कर. मी सध्या एका सिक्रेट प्रोजेक्टमध्ये इनव्हॉल्व असून हा फोटोशूट त्याचाच भाग आहे.’ असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.