एंजलीना जोलीने आपले वक्ष काढले

WD
हॉलीवूड अभिनेत्री एंजलीना जोलीने ब्रेस्ट कॅसरपासून स्वतः:चा बचाव करण्यासाठी एक ऑपरेशन केले आहे.

तिला डबल मासटेकटॉमी ऑपरेशनहून जावे लागले आहे, ज्यात कॅसरपासून बचाव करण्यासाठी दोन्ही वक्ष (स्तन) आंशिक किंवा पूर्णपणे काढावे लागतात.

37 वर्षीय एंजलीनाने न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित आपल्या आलेखात ह्या सर्जरीबद्दल म्हटले असून त्याचे कारण देखील सांगितले आहे.

एंजलीनाने म्हटले की तिच्या डॉक्टरांना पूर्ण अनुमान आहे की तिला स्तन कॅसर होण्याच्या धोका 87 टक्के आणि अंडाशयाचा कर्करोग होण्याचा धोका 50 टक्के आहे.

तिने म्हटले की मासटेकटॉमीची प्रक्रिया फेब्रुवारीत सुरू झाली असून ती एप्रिलमध्ये पूर्ण झाली आहे.

'माय मेडिकल चॉइस' शीर्षकाच्या नावावे लिहिलेल्या लेखात एंजलीनाने संगितले की तिची आईने किमान एक दशकापर्यंत कॅसरला झुंज दिली आणि वयाच्या 56व्या वर्षात तिचा याच आजाराने मृत्यू झाला.

एंजलीनाला सारखी ही भिती वाटत असते ह्या आजारामुळे तिचे मुलं तिच्यापासून दूर तर होणार नाही ना? पण हे सत्य आहे की माझ्या शरीरात एक खराब जीन बीआरसीए1 आहे जो स्तन कॅसर किंवा अंडाशयाच्या कॅसरला अधिक वाढवतो.

तिने म्हटले की जेव्हा तिला जीन बीआरसीए1बद्दल कळाले तेव्हा तिने डबल मासटेकटॉमीच्या 9 आठवड्यापर्यंत चालणार्‍या या प्रक्रियेस जाण्याचा निर्णय घेतला.

वेबदुनिया वर वाचा