एकेकाळी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. गवान शंकराला त्यांनी प्रसन्न करून त्यांच्याकडून त्याने त्याला कोणी, पाताळात जमिनीवर तसेच आकाशात मारू शकणार नाही असा वर घेतला. त्यामुळे तो खूप अहंकारी झाला आणि स्वतःला देवापेक्षा बलवान समजायला लागला. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता.
प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. त्या चितेमध्ये होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला अग्नी देखील काही करु शकली नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला. अशाप्रकारे त्यादिवशी लोकांनी उत्सव साजरा केला. आणि तो दिवस ‘होलिका दहन’ म्हणून ओळखू लागले.