गणेशाला प्रथम वंदनीय देव मानलं गेलं आहे. म्हणूनच कोणत्या शुभ कार्य आरंभ करण्यापूर्वी गणपतीची पूजा करावी. गणेश पूजनासाठी बुधवार हा दिवस उत्तम मानला गेला आहे. या दिवशी पूजा केल्याने कुंडलीतील बुध दोष दूर होतो. ज्योतिष शास्त्रात बुध ग्रहाला वाणी, वाणिज्य, लेखन, कायदा आणि गणित इतरांचं कारक मानलं गेलं आहे. बुधवारी विधीपूर्वक पूजा केल्याने बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि या दिवशी व्रत केल्याने तर गणपतीच्या कृपेचा वर्षाव होतो.
दूर्वा अर्पित करण्यामागील कारण
पौराणिक कथेप्रमाणे अनलासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना छळायचा. ऋषी- मुनी देखील त्याच्या अत्याचाराला कंटाळले होते. आणि त्यापासून सुटका मिळवण्यासाठी ते महादेवाकडे पोहचले. भगवान शिव म्हणाले की या दैत्याला विनाश गणपतीच करु शकतात. ऋषी-मुनी आणि इतर देवगण गणपतीकडे पोहचले आणि रक्षेसाठी प्रार्थना करु लागले. सर्वांची प्रार्थना ऐकून गणपतीने राक्षस अनलासुराला गिळून घेतलं. राक्षसाला गिळल्याने त्यांच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा कश्यप ऋषींनी गणपतीला दूर्वाच्या 21 गाठी खाण्यासाठी दिल्या. त्या पोटात गेल्यावर पोटाची अग्नी शांत झाली. तेव्हापासून गणपतीला दूर्वा अर्पित करण्याची पद्धत सुरु झाली.